Recent Tube

Breaking

Monday, December 2, 2024

कडलास गावाचे उपसरपंचपदी शेकापच्या सौ.सुमन अनुसे यांची निवड.



कडलास गावाचे उपसरपंचपदी शेकापच्या सौ.सुमन अनुसे यांची निवड.


सांगोला(प्रतिनिधी):- कडलास गावाचे उपसरपंचपदी शेकापच्या सौ.सुमन दादासो अनुसे यांची निवड करण्यात आली.युवा नेते निलेश अनुसे यांच्या मातोश्री आहेत. नूतन उपसरपंच सौ.सुमन दादासो अनुसे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.निकीताताई देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सीमा औदुंबर केदार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी काल सोमवार दि.2 नोव्हेंबर रोजी निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवड सदस्य मतदानातून झाली. यामध्ये सुमन अनुसे यांच्या बाजूने 11 तर विरोधी उमेदवार यांच्या बाजूने 6 मते पडली.अध्यासी अधिकारी दिगंबर भजनावळे व ग्रामसेवक राजकुमार ताटे यांनी सुमन अनुसे यांना विजयी घोषित केले. 

निवडीप्रसंगी मारूती लवटे, बाबुराव गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, समाधान पवार, डॉ यशोदिप गायकवाड, अरूण वाघमोडे , नारायण वाघमोडे, रामहरी ननवरे, अंकुश ननवरे निलेश माने, दत्तात्रय जाधव, प्रशांत साळुंखे, पांडूरंग काशिद, बंडू सातपुते, शिवाजीराव ठोकळे, आदी मान्यवर उपस्थित होते . निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला.

No comments:

Post a Comment