परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील संविधानाच्या प्रतिकृती शिल्पावर दगडाने हल्ला करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकावर व या गंभीर घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून यापुढे अशा गंभीर घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी.
या मागणीचे निवेदन बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री कणसे साहेब व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंदाळे साहेब यांना निवेदन देऊन परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनोद उर्फ कालिदास कसबे, तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर यादव, प्रशांत चंदनशिवे, स्वप्निल माने, बंडू माने, सागर जगधने,अमित कसबे, संतोष जगधने,
सागर जगधने, दादासो पाटोळे, राहुल रुपनर, सत्विक नवघरे, अमोल नवघरे, अतिश नवघरे,अतुल कांबळे, धीरज गडहिरे, विक्रम भोसले, अक्षय गंगणे, विशाल जगधने, साहिल मागाडे, कुमार गडहिरे, जयेश चंदनशिवे,साई कसबे,संतोष कसबे, अमोल कसबे, संघर्ष कसबे,हर्ष मागाडे, प्रथमेश मागाडे व असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.




No comments:
Post a Comment