Recent Tube

Breaking

Tuesday, December 10, 2024

सांगोला तालुक्यातील गुन्हेगारी मुळासकट नष्ट करा. अशा कडक सूचना आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस प्रशासनास दिल्या.



सांगोला तालुक्यातील गुन्हेगारी मुळासकट नष्ट करा. अशा कडक सूचना आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस प्रशासनास दिल्या. 



गेल्या काही महिन्यांपासून सांगोला पोलिस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या  दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे.त्याच.प्रमाणेसांगोल्याच्या आठवडी बाजारांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. सांगोला येथील आठवडी बाजार हा रविवारी असतो आणि या आठवडी बाजारांमध्ये मोबाईल, पर्स, चोरी होण्याचे सत्र हे सुरूच आहे. आठवडी बाजार हा चोरी करणार्‍या चोरट्यांसाठी पर्वणीच ठरलेला आहे. त्यामुळे सांगोला शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी काल मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी  सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना सूचना दिल्या आहेत.


शहरात चोरीच्या घटना घडत असून अनेक परप्रांतीय कामगार हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. सांगोला शहर व तालुका परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परप्रांतीय कामगारांची सर्व माहिती पोलीस स्टेशनला जमा करून घ्यावी अशीही सूचना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिल्या आहेत.


त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झालेली घटना निषेधार्थ आहे. सांगोला तालुक्यात स्व.आबासाहेब यांच्या प्रमाणेच गुन्हेगारी प्रवृत्तीला कदापिही थारा देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून आरोपीस लवकरात लवकर अटक करा अशी सूचनाही आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. 



चौकट:  सांगोला तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्या तसेच ज्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींची ये-जा होते, अशा ठिकाणी व आठवडा बाजारात पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment