Recent Tube

Breaking

Friday, November 15, 2024

सांगोला तालुक्यातील वैद्यकिय आरोग्यसेवकांचा डॉ बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी महामेळावा.



सांगोला तालुक्यातील वैद्यकिय आरोग्यसेवकांचा डॉ बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी महामेळावा.


लढाई स्वाभिमानाची ,लाट परिवर्तनाची.


वैद्यकिय आरोग्यसेवकांचा महामेळावा


२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत डॉक्टर उमेदवार मा.श्री.डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख, हृदयरोग तज्ञ, सांगोला यांना एकमतानं एका दिलाने आपल्या सांगोला तालुका व पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रातील एक  तरुण  उमदा डॉक्टर  उमेदवार ज्यांची सुमारे १० ते १५ वर्ष वैद्यकीय-आरोग्य या क्षेत्रांशी संबंधित असून आरोग्य-वैद्यकीय या क्षेत्राशी त्यांची नाळ जोडली  आहे.


आणि माणसांची नस ओळखण्यात ज्यांनी प्राविण्य मिळविले आहे... हजारो युवकांच्या हृदयावर  अधिराज्य गाजवणारे हृदयरोग तज्ञ डॉ.बाबासाहेब देशमुख यांना समर्थन  देण्यासाठी सांगोला पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रातील पुरोगामी विचाराचे सर्व डॉक्टर्स, फार्मासिस्ट ,पॅरा मेडिकल - नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व स्टाफ- कर्मचारी तसेच सर्व सांगोला तालुक्यातील समविचारी वैद्यकीय क्षेत्रातील सुजान आरोग्य सेवक यांनी डॉ.बाबासाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी.

शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी हॅप्पी पार्क चौपाटी, वासुद रोड, सांगोला येथे सहकुटुंब सहपरिवार हजर राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment