आलदर हॉस्पिटल मध्ये ७ वर्षाच्या बालकावर यशस्वी उपचार.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील नामवंत आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून २१ दिवसापासून ताप असलेल्या ७ वर्षाच्या बालकावर यशस्वी उपचार.
आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सांगली शहरातुन आलेल्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून रुग्णाला गेले २१ दिवसा पासून दिवसातून २ ते ३ वेळा जास्त प्रमाणात ताप येत होता. रुग्णाचे नातेवाईक बाळाला हॉस्पिटल मधे घेऊन आले. बाळाच्या रक्ताची तपासणी ,एक्स रे व अन्य तपासण्या एडमिट केल्यावर पाठवण्यात आले.
त्वरित उपचार चालू केल्यामुळे व योग्य निदान केल्यामुळे रुग्णाचा कालांताराने ताप थांबण्यास सुरवात झाली ,बाळा ची प्रकृती ७ दिवसा मधे पूर्ण सुधरल्या नंतर घरी डिसचार्ज देण्यात आला. सर्व उपचार आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत करण्यात आले आहेत.
डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला.
नातेवाईकांना जेवण, औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत व उत्तम देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.
तरी सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment