डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या बाबतच्या बातम्या खोडसाळ पणाच्या -भाई चंद्रकांत सरतापे.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
गेले चार दिवस डाॅ भाई बाबासाहेब देशमुख हे मुंबई येथे विधानसभा निवडणुकीच्या वेगवेगळ्या बैठकीत व्यस्त होते..प्रागतीक पक्षाची आघाडीच्या बैठका होत्या.
शेकाप ,कम्युनिस्ट ,समाज वादी पार्टी आशा पक्षांची आघाडी असुन त्यांनी लोकसभेपुर्वी प्रागतीक आघाडी स्थापन केलेली आहे त्या आघाडीच्या बैठकामध्ये अनेक नेत्यासह डाॅ.बाबासाहेब देशमुख हे सहभागी होते त्यामुळे बाबासाहेब देशमुखांचा बहुतांश वेळा फोन ब़दआसायचा परंतु ठरावीक वेळेस त्यांचा फोन चालु असायचा अनेक जणांसोबत त्यांचा फोनवरती संवाद व्हायचा तरीही काहींनी खोडसाळपणे बाबासहेब देशमुख स्विच आॕफ असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातुन दिल्या गेल्या व काहींनी तर आणखीनच कहरच केला.. ते म्हणजे डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणविस यांच्या संपर्कात आसल्याने फोन बंद ठेवला आहे..आशा चुकीच्या बातम्या प्रसारीत करुन शेतकरी कामगार पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीव पुर्वक केला जात आहे.
स्व.आबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन बाबासाहेब देशमुख हे जनसेवा करीत आहेत ते कोणताच निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेऊन करताता ..व बाबासाहेबावरती आबासाहेबांच्या विचारांचा एवढा पगडा आहे की...ते राजकारण करताना सुध्दा फक्त जनतेच्या विकासासाठी राजकारण करतात.शेतकरी कामगार पक्षातील नेते हे शेतकरी कष्टकरी कामगार दलीत व लहान मोठे व्यावसायीक यांच्या हिताचे व यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राजकारण करीत आसतात उगीचच स्वार्थाचे राजकारण करीत नाहीत.
जे स्वार्थाचे राजकारण करतात त्यांना पक्ष बदलले ,विचारधारा बदलने याचे काहीही वाटत नसते..आज शेतकरी कामगार पक्ष राज्यात जरी संख्येने कमी प्रमाणात आसला तरी शेतकरी कामगार पक्षाची पथ, प्रतिष्ठा व निष्ठा सर्वोच्छ आसल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे



No comments:
Post a Comment