Recent Tube

Breaking

Friday, October 4, 2024

चाकण येथे सौ.मुक्ताई गणेश गायकवाड यांचा स्नेहमेळावा संपन्न



चाकण येथे सौ.मुक्ताई गणेश गायकवाड यांचा स्नेहमेळावा संपन्न.



दीपक आबा साळुंखे - पाटील यांचे पुणे येथील विश्वासू कार्यकर्ते समाधान पाटील यांचा पुढाकार.   



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



पुणे जिल्ह्यातील चाकण येथे सांगोला तालुक्यातील नोकरी,व्यवसायानिमित्त पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच आगामी विधानसभा निवडणूक विषयी जनतेची मते जाणून घेण्यासाठी या  स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .


माजी विधानपरिषद सदस्य मा दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कन्या मा सौ.मुक्ताई (दीदी)गणेश गायकवाड यांच्या उपस्थितीत चाकण येथील गुडलक हॉटेल येथे या मेळाव्याचे आयोजन दीपक आबा युवा मंच पुणे यांचे वतीने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

यावेळी बोलताना मुक्ताई दीदी यांनी उपस्थित सगळ्यांना घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्या दिल्या व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,सांगोला विधानसभा निवडणूक 2024 ही दीपक (आबा)साळुंखे पाटील हे लढविणार आहेत.

सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आबांना साथ देवून सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून निवडून देवुया. 13 ऑक्टोबर रोजी मोठा मेळावा आयोजित केला आहे त्यास स्वतः दीपक (आबा)आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुक्ताई  दीदी गायकवाड यांनी केले आहे.  पुढे बोलताना सौ.मुक्ताई दीदी म्हणाल्या की,पुण्यासारख्या एमआयडीसी सांगोल्यात निर्माण करायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकदा आबांना साथ द्यावी.कारण गेली 40 वर्षे  आबा जनतेसाठी अहोरात्र कार्य करीत आले आहेत.


निश्चितच पुण्यासारखे प्रकल्प सांगोला तालुक्यात उभा राहतील याची ग्वाही दिली. या स्नेह मेळाव्याचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते समाधान पाटील म्हणाले की,कोणताही माणूस आबांच्याकडे आला तर आबा त्याचा जात,धर्म, पक्ष न विचारता त्याचे म्हणणे,समस्या समजून घेतात व त्या सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात.


त्यामुळे सत्ता असो किंवा नसो आबांच्याकडे समस्या घेवून गेले की काम होतेच असा माझा अनुभव आहे.                                             या कार्यक्रमास सांगोला विधानसभा मतदारसंघातील पुण्यात राहणारे शेकडो नागरिक ,महिला वर्ग उपस्थित होते.स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment