रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरज दादा बनसोडे यांच्या अभिवादन सभेचे आयोजन.
रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया सामाजिक संघटना व सुरज दादा बनसोडे मित्रपरिवार सांगोला तालुका यांच्या वतीने मंगळवार दिनांक 5/ 11/2024 रोजी सकाळी 11 वाजता बौद्ध विहार भीमनगर सांगोला येथे आयोजित केली आहे
सांगोला तालुक्यातील व शहरातील दिवंगत पॅंथर सुरज दादा बनसोडे मित्र परिवार यांनी सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज व सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत सुरज दादा बनसोडे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शोक सभेचे आयोजन केले आहे.
तरी सांगोला तालुक्यातील तमाम सुरज दादा प्रेमींनी या अभिवादन सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment