Recent Tube

Breaking

Sunday, October 27, 2024

दिपकआबांना आमदार करण्यासाठी हजारो धनगर तरुणांचे बिरोबाला साकडे ; आबांना आमदार करण्यासाठी दोन हजार तरुणांनी घेतली शपथ



दिपकआबांना आमदार करण्यासाठी हजारो धनगर तरुणांचे बिरोबाला साकडे ; आबांना आमदार करण्यासाठी दोन हजार तरुणांनी घेतली शपथ


सांगोला : तालुका प्रतिनिधी ढोलाच्या गजरात, भंडारा उधळीत, "बिरोबाच्या नावाने चांगभलं"  असा गजर करीत सांगोला तालुक्यातील २ हजार धनगर समाज बांधवांनी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याची शपथ घेतली. यावेळी धनगर समाज बांधवांनी पारंपारिक घोंगडं, काठी, ढोल देऊन दिपकआबांचा सत्कार करून धनगर समाज बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे अशी ग्वाही दिली. 



      महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्यासाठी सांगोला तालुक्यातील दोन ते अडीच हजार धनगर समाज बांधवांनी आरेवाडी ता.कवठेमंकाळ येथील श्री बिरोबा देवाला साकडे घातले. यावेळी दिपकआबांसह धनगर समाज बांधवांनी बिरोबाच्या नावाने चांगभलंचा गजर करीत आरेवाडीच्या बनात बिरोबाचे दर्शन घेतले. यावेळी धनगर समाज बांधवांनी बिरोबा देवाला नैवेद्य अर्पण करून अभिषेक करून दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याची शपथ घेतली.यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक घोंगडं, काठी, ढोल, काठी देऊन दिपकआबांचा सत्कार करण्यात आला.

        यावेळी धनगर समाज बांधवांनी सांगितले की, दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आयुष्यभर जात-पात, धर्म, पार्टी न पाहता उपेक्षीत धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. दिपकआबांनी गणपतराव देशमुख यांना २५ ते ३० वर्षे मदत केली. त्यामुळे आज आम्ही दिपकआबांना आमदार करण्यासाठी शपथ घेत आहोत असे सांगत धनगर समाज बांधवांनी भंडाऱ्याची उधळण केली. 



      यावेळी सावे येथील अजित देवकते हा तरुण घणाघाती भाषणात दिपकआबांवर कशा प्रकारे अन्याय झाला हे सांगताना भावूक झाला. धनगर समाज पेटून उठला आहे गेली २५ वर्षे गणपतराव देशमुख यांना दिपकआबांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याची वेळ आली आहे. दिपकआबांना आमदार करण्यासाठी आम्ही धनगर समाज बांधव सज्ज आहोत. कुणी कितीही देव पाण्यात घातले तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नसतो असे सांगून यंदा दिपकआबांना आमदार करणारच अशी बिरोबा देवासमोर शपथ घेतली. 



      यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावातील धनगर समाज बांधवांसह भाळवणी गटातील सोनके, तिसंगी, केसकरवाडी, शेंडगेवाडी येथील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. बिरा पुकळे, शहाजी खरात, सोमा खरात, प्रवीण पाटील, दिलीप मस्के, प्रताप मस्के, शिवाजी कोळेकर (कोळा), अनिल मोटे, विष्णू सरगर, शाहूराजे मेटकरी, विजय दुधाळ, प्रविण खरात, डॉ. सुधाकर महानवर, नवनाथ मोरे, नागा लवटे, कोंडिबा लवटे, काका बेहरे, पोपट हजारे, बाबा इमडे, तानाजी लवटे, सुनील चोरमले, वस्ताद बंडगर, संजय आलदर, श्रीरंग खांडेकर, पांडुरंग रुपनर, गणेश कोळेकर, धनाजी सरगर, तातोबा सरगर, बापू कोळेकर, सखाराम तंडे, भागवत तंडे, सदाशिव रुपनर, विलास व्हनमाने, योगेश वलेकर, सयाप्पा आलदर, तानाजी आगलावे, विक्रम बुरगे, बंसवत वगरे, शिवाजी काका बंडगर, अशोक चोरमले, विलास पावणे, रवि चौगुले, राजाराम वलेकर यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.



चौकट ; 


गेली ३५ वर्षे ज्या माणसाने राजकारणात कधीच जात पात किंवा पक्ष धर्म असा भेदभाव केला नाही. अगदी मध्यरात्री २ वाजता मदतीसाठी त्यांचे दार ठोठावले तरी मदतीसाठी ज्या व्यक्तीने कधीच क्षणाचा विलंब केला नाही. अशा सर्वच समाजाला भरल्या हाताने मदत करणाऱ्या नेत्याच्या उपकरातून उतराई होण्याची ही सर्वांना संधी आली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता अनेक नेते आता जातीचे झुल पांघरून मतांची भीक मागण्यासाठी येतील त्यांना अजिबात थारा देऊ नका दिपकआबांना आमदार केल्याशिवाय आता धनगर समाजातील तरुण स्वस्थ बसणार नाही


अजित देवकते,

सावे, ता सांगोला.

No comments:

Post a Comment