आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील उदनवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये आलदर हॉस्पिटलच्या वतीने मंगळवार दिनांक 1 आक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते 18 वर्षापर्यंत रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल त्याचबरोबर त्या रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जातील.
तसेच ज्या रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज असल्यास आलदर हॉस्पिटल एरंडे कॉम्प्लेक्स सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील.
तरी गोर गरीब व गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.
या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी व या शिबिराचा लाभ घेण्यासाठी 9029044009 या मो नंबर वरती संपर्क साधवा.



No comments:
Post a Comment