Recent Tube

Breaking

Saturday, September 21, 2024

आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाज भवन व अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर



आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाज भवन व अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर


 लोणारी समाजाच्या वतीने दोन्ही नेते मंडळींचे आभार  


सांगोला ; तालुका प्रतिनिधी सांगोला शहरांमध्ये लोणारी समाज रत्नपितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारका करिता व लोणारी समाज सभागृह व अभ्यासिका याकरिता नगरपालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी. याकरिता लोणारी समाजाच्या वतीने नुकतेच बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणादरम्यान समाजाच्या वतीने वरील मागण्या करण्यात आलेल्या होत्या. या मागण्यांची दखल प्रशासन व येथील आजी माजी लोकप्रतिनिधींनी घेऊन समाजास नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देऊ केली आहे.

    या जागेवरती भव्य सभागृह व अभ्यासिका बांधकामा करिता तालुक्याचे विद्यमान आमदार ऍड. शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. व या पाठपुरावाची उपलब्ध म्हणून समाजाच्या वरील कामाकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी मा. आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्याकडे रुपये पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरली होती. आबा व बापूंच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर लोणारी समाजास प्रथमता इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध  करून घेण्यात या दोन नेतेमंडळींना यश आले आहे. त्यामुळे या दोन्हीही नेते मंडळींचे सांगोला तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

    तथापि समाजाच्या वतीने पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, यातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असले तरी, या तालुक्यामध्ये असणारी समाजाची संख्या लक्षात घेता सभागृह व अभ्यासिका नयनरम्य देखणी व टोलेजंग होण्याकरिता हा निधी तुटपुंजा ठरणार असल्याने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी या समाजाची आजही मागणी आहे. आणि उर्वरित निधी लवकरात लवकर समाजास उपलब्ध होईल अशी समाजाच्या वतीने अशा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment