सांगोला तहसील कार्यालयासमोर दूध दरवाढीसाठी विकास साळुंखे या शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण सुरू.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तहसील कार्यालयासमोर गायगव्हाण येथील शेतकरी विकास रामेश्वर साळुंखे यांचे मंगळवार दिनांक 25/ 6/ 2024 रोजी पासून दूध दरवाढीच्या संदर्भात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या बेमुदत उपोषणामध्ये दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा, पशुखाद्याच्या गुणवत्तेवर व दरावर सरकारचे नियंत्रण असावे, महाराष्ट्रातील भेसळयुक्त दुधाचा पुरवठा बंद करावा, मागील अनुदान किचकट अटी व नियम न घालता सरकारने सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे, 11 मार्च 2024 पासून बंद झालेले अनुदान आज अखेर पर्यंत दूध उत्पादकास एकर कमी विना अटी शर्ती द्यावे, सरकारने भाकड जनावरांना प्रति महिना 1500 रुपये अनुदान द्यावे, प्रत्येक पशुस विमा संरक्षण मिळावे या विविध मागण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास विकास साळुंखे व समस्त ग्रामस्थ गायगव्हाण बसले आहेत.
या बेमुदत उपोषणास सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शासनाने या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर मागण्या मान्य करून न्याय देण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे विकास साळुंखे यांनी सांगितले आहे.
या बेमुदत उपोषणास भीम क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर बळीराम मोरे यांनी पाठिंबा दिला.


No comments:
Post a Comment