बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद बनसोडे यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सोलापूर येथे बहुजन समाज पार्टीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघा बद्दल आढावा घेण्यात आला. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मिलिंद बनसोडे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
मिलिंद बनसोडे हे गेल्या वीस वर्षापासून बहुजन समाज पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळखले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बहुजन समाज पार्टीची विचारधारा पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे व अभिनंदन केले जात आहे.
या निवडीस राज्याचे झोन प्रभारी आप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष लोहार साहेब, जिल्हा महासचिव अशोक ताकतोडे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रशिक माने, सोलापूर शहराध्यक्ष राहुल सर्वगोड व बार्शी विधानसभेचे निरीक्षक विलास शेरखने व जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मिलिंद बनसोडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


No comments:
Post a Comment