सांगोला येथे महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला/प्रतिनिधी - बोधिवृक्ष महिला प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगोला व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या वतीने सांगोला शहरातील भिमनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानिमित्त बुध्दविहार सांगोला येथे सांगोला पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे या ‘महिलांचे सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला, मुली यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment