Recent Tube

Breaking

Friday, March 8, 2024

वाकी (शिवणे) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची बैठक संपन्न.



वाकी (शिवणे) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची बैठक संपन्न.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614

 


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 7/3 /2024 रोजी सायंकाळी 8 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये जयंती अध्यक्षपदी समाधान गायकवाड, उपाध्यक्ष हिरा सुनार, खजिनदार समाधान देवाप्पा होवाळ, सहखजिनदार निलेश होवाळ, कार्याध्यक्ष शहाजी होवाळ, मार्गदर्शक मधुकर गाडे सर यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या आहेत. 


या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2023 रोजीच्या जयंतीचा संपूर्ण हिशोब देण्यात आला.

  

यावेळी दीपक होवाळ नितीन होवाळ सचिन गोतसुर्य सर्जेराव उबाळे राजू होवाळ अनिल होवाळ अमोल उबाळे सतीश उबाळे योगेश माने विशाल होवाळ हर्षद होवाळ शकील सावंत शैलेश झेंडे बाळासाहेब होवाळ स्वप्निल बाबर अमित कांबळे शरद होवाळ  अजित होवाळ दादासाहेब होवाळ दादासाहेब मोरे सुंदर काटे बंटी होवाळ यश गोतसुर्य प्रणल होवाळ संदीप गोतसुर्यअसंख्य भीमसैनिक उपस्थित होते.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल उबाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच सतीश होवाळ याची शिक्षक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment