न्यू इंग्लिश स्कूल जुनि कॉलेज सांगोला मध्ये कौशल्य कार्यशाळा संपन्न ..
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
न्यू इंग्लिश स्कूल जुनि कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजना व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली .यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या सौ नंदा रोकडे मॅडम (लिडर ) व श्री बापूसाहेब ठोकळे ( सांगोला तालुका प्रतिनिधी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री . हेमंतकुमार आदलिंगे होते . एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा .संतोष राजगुरू उपस्थित होते .यावेळी मार्गदर्शन करताना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सौ नंदा रोकडे मॅडम यांनी शालेय जीवनामध्ये कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे . परिपूर्ण जीवन जगण्यासाठी या कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे असे मत मांडून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या . ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण . आहे अशांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ची संपर्क साधावा असे अवाहन केले . वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या संधी माफक दरात उपलब्ध आहेत असे सांगितले . यावेळी श्री बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण जे काही करत आहोत ते पुण्य कर्म आहे यामुळे आपणाला व आपल्यामुळे इतरांना करियर घडविण्याची सुवर्णसंधी आहे .या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे असे सांगितले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री हेमंतकुमार आदलिंगे यांनी आपल्या मनोगता मध्ये कोणताही व्यवसाय करत असताना त्याला कमी न लेकता कष्ट करायची तयारी असेल तर निश्चितच ते काम तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवेल . स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही स्वतःचे आयुष्य घडवू शकता .श्रमाची प्रतिष्ठा आपणाला कुठेही कमी पडू देत नाही .त्यामुळे या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा व इतरांनाही त्याची माहिती द्यावी असे आवाहन केले .यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ .जुलेखा मुलाणी यांनी केले तर आभार प्रा श्री संतोष राजगुरु यांनी मानले


No comments:
Post a Comment