Recent Tube

Breaking

Sunday, February 4, 2024

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांची देशमुख बंधु सोबत भेट व चर्चा.



वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांची देशमुख बंधु सोबत भेट घेऊन चर्चा.  



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112 049614



देशमुख बंधूंची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण. 



वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा राहूल चव्हाण व जिल्हा महासचिव मा विशाल नवगिरे हे काल पक्षाच्या आढावा बैठक व कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश या निमीत्ताने ते सांगोला दौवऱ्यावर आले असता कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व अढावा बैठक झाले नंतर त्यांनी डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ अनिकेत देशमुख या दोन ही बंधुची भेट घेतली .

गेल्या काही दिवसांपापूर्वी डॉ बाबासाहेब देशमुख व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष यांनी देखील आदरणीय श्रद्धेय ॲ बाळासाहेबा आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती व सध्या राज्यात महाविकास अघाडीत वंचित अघाडी देखिल सहभागी होत आहे , कदाचीत तसे झाल्यास २०२४ मध्ये सांगोल्यात वंचित सोबत आल्यास राजकीय चित्र बदलु शकते मागील विधानसभा व  लोकसभेची मते वंचित आघाडीची निर्णायक राहीली आहेत , गेल्या पाच वर्षात वंचित आघाडी हा पक्ष पुर्वी पेक्षा अधिक भक्कम बनला आहे , त्यामुळे डॉ देशमुख  यांचे राजकीय पारडे अधिक जड होऊ शकते 

अशा प्रकारच्या प्रतिक्रिया  जनतेतुन येत आहेत ,सदर भेटी प्रसंगी सांगोला तालुक्याचे नेते गोपाळ लांडगे   ( सर ) , जिल्हा उपाध्यक्ष राजु गुळीग , जिल्हा उपाध्यक्ष राविराज सर्वगोड हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment