लक्ष्मीनगर गावाला पिण्याचे पाणी न मिळाल्यास सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार - कैलास हिप्परकर.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
लक्ष्मी नगर गावामध्ये मागील तीन महिन्यापासून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर विषयावर स्थानिक अधिकारी व पदाधिकारी यांना जागे करण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडिया द्वारे प्रिंट मीडिया द्वारे त्याच्या वरिष्ठ कार्यालयाच्या मदतीने बरेच प्रयत्न झाले परंतु पिण्याच्या पाण्याच्या अति संवेदनशील विषयावर प्रशासकीय पालकत्व म्हणून सांभाळणारे गावचे व संवेदनशील ग्रामसेवक व इतर जबाबदार घटकांना याचे काही गांभीर्य नसल्याने अखेर गावातील महिलांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला होता पर्यायी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेत हा विषय ग्रामसभेसमोर ठेवला असता ग्रामसेवकाने आपल्यातच नव्हे तर सगळीकडे अशीच परिस्थिती आहे गावातील पाणीपुरवठा विहिरीतच पाणी नाही, शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे पाणी घेण्याच्या मागणीवर ग्रामपंचायतकडे पैशाची कमतरता आहे
त्यासाठी तुम्ही पाणीपट्टी आणि त्या योजनेची पाईपलाईन फुटले आहे, मोटर जळाली आहे, टँकरच्या मागणीवर तुम्ही टँकर बघा व आसपास कुठे पाणी आहे ते चौकशी करा असे लोकांनाच बे जबाबदारपणे वक्तव्य करून ग्रामसभेत हा विषय नेहमीप्रमाणे गुंडाळला जनतेच्या पैशातून पगार घेणारे ( ग्रामसेवक) हे लोक आपल्या हजरी पुरते कधीतरी गावात येताना स्वतःसाठी मिनरल वॉटर घेऊन येतात व आपल्या मर्जीतील ठराविक लोका संगे मिळून पितात परंतु घशाला कोरड पडलेल्या लोकांच्या पाणी प्रश्नासाठी कोणतीच उपाय योजना करीत नाहीत शिवाय गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याच्या दृष्टीने जल जीवन योजनेचे काम फार मंद गतीने चालू आहे तरी जीवनावश्यक या पाणी प्रश्नावर वरिष्ठ अधिकारी तहसीलदार साहेब व गट विकास अधिकारी साहेब यांनी यात स्वतः लक्ष घालावे या पाणी प्रश्नावर त्वरित तोडगा न निघाल्यास जर आम्हाला पिण्यासाठी पाणीच नसेल तर जेवण कसे बनवणार त्यासाठी अन्नाचाच त्याग करू व तहसील कार्यालयासमोर जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी तहसील कार्यालय सांगोला येथे बेमुदत उपोषण करू असा इशारा समाजसेवक कैलास हिप्परकर यांनी दिला.


No comments:
Post a Comment