Recent Tube

Breaking

Wednesday, February 21, 2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाकी शिवणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाकी शिवणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614 


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 25 /2/ 2024 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. व सोमवार दिनांक 26/ 2/ 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या डान्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 10 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 7 हजार रुपये, तृतीय बक्षीस 5 हजार रुपये, चतुर्थ बक्षीस 3 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी 100 रुपये राहील व तसेच मंगळवार दिनांक 27/ 2/ 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक वाकी गावातून काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीमध्ये मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मिरवणुकीची शोभा वाढवायची आहे.अासे आव्हान शिवप्रेमी तरुण मंडळ वाकी शिवणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment