छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने अल्पदरात शस्त्रक्रिया सुरू.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ते शुक्रवार दिनांक 31 मे 2024 पर्यंत अल्प दरात शस्त्रक्रिया सरू करण्यात आली आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, नॉर्मल डिलेव्हरी, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, गर्भाशयाची पिशवी काढणे, अपेंडिक्स ऑपरेशन, हर्निया ऑपरेशन, मुळव्याध, फिच्युला व फिशर इत्यादी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
यामध्ये मेडिकल, भूल व लॅबचा खर्च वेगळा राहील.
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत गाडगेबाबा जयंती, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, महात्मा फुले जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी, महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजी राजे जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती या सर्व महामानवांच्या जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यामध्ये दरवर्षी वेगळ्या पद्धतीने विविध उपक्रम राबविले जातात.
सांगोला तालुक्यातील नागरिकांकडून यामुळे खंडागळे हॉस्पिटलचे व डॉ परेश खंडागळे यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सांगोला तालुक्यातील गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ परेश खंडागळे व डॉ स्वाती खंडागळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment