Recent Tube

Breaking

Wednesday, January 17, 2024

लोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शहाजीबापू पाटील ग



लोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शहाजीबापू पाटील गटाचे नामदेव लवटे यांची निवड.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच विजय उत्तम खांडेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी शिवसेना शहाजी बापू गटाचे नामदेव शामराव लवटे व शेतकरी कामगार पक्षाचे संभाजी यशवंत लवटे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 11 पैकी शिवसेना शहाजीबापू गटाचे व खांडेकर गटाचे उमेदवार नामदेव शामराव लवटे यांना 7  मते तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संभाजी यशवंत लवटे यांना 4 मते पडली.या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील व उत्तमदादा खांडेकर गटाचे उमेदवार नामदेव लवटे हे विजय झाले.

या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी पी एस जाधव यांनी काम पाहिले व सरपंच म्हणून नामदेव लवटे यांची घोषणा केली.

नूतन सरपंच नामदेव लवटे यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते फेटा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व शहाजी बापू गटाच्या व उत्तम दादा खांडेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्याची आताषबाजी करून मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तम दादा खांडेकर शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, संचालक सागर लवटे, विजय खांडेकर, विलास विभुते, दिलीप लवटे, मधुकर लवटे, राजू हजारे, आप्पा सरगर, व्हा चेअरमन सुनील देशमुख, प्रसाद लवटे, पंचायत समिती सदस्य सौ रुपाली लवटे, बाळाराम लवटे उपस्थित होते यावेळी शिवसेना शहाजी बापू पाटील व उत्तम दादा खांडेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला.

या सरपंच पदाच्या निवडीवेळी माजी सरपंच विजय खांडेकर, उपसरपंच शांताबाई चव्हाण, दिपाली लवटे, हिराबाई सरगर, नकुसाताई लवटे, सत्यवान देशमुख, व असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी पोलीस बापूसाहेब झोळ लक्ष्मण वाघमोडे यांनी पोलीस बंदोबस्त कडक ठेवला होता व तसेच पोलीस पाटील जयश्री सावंत, धनाजी पाटील हेही उपस्थित होते. 

या निवडीसाठी निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून मंडल अधिकारी एस एस जाधव, तलाठी कडलसकर मॅडम, ग्रामसेवक आदाटे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment