डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची रामचंद्र दिगंबर बाबर कुटुंबियांकडून ग्रंथतुला.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथ व इतर साहित्य भेट.
सांगोला/प्रतिनिधी: पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस 3 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला . वाढदिवसाचे औचित्य साधून, चोपडी येथील नामदेव दिगंबर बाबर यांचे स्मरणार्थ रामचंद्र दिगंबर बाबर यांच्या परिवाराकडून बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.बाबासाहेब देशमुख यांची ग्रंथतुला करून पुस्तके, ग्रंथ, तसेच खुर्च्या, टेबल कपाट प्रशालेस भेट देण्यात आले.
हा कार्यक्रम मंगळवार 23 जानेवारी 2024 रोजी बाळासाहेब देसाई विद्यालयात सकाळी 9 वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमप्रसंगी शेकापचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, रामचंद्र दिगंबर बाबर, मुख्याध्यापक के.डी .बाबर, उद्योजक शहाजी उर्फ आबासाहेबशेठ बाबर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.एस.बाबर उद्धवशेठ बाबर, बालेखान शेख, सुभाषशेठ बाबर , मा.चेअरमन संभाजी पवार, बाबुराव बाबर, माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बाबर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. बी .बाबर ,अशोक चौगुले, सुरेश सूर्यवंशी, मधुकर बाबर, हनमंत चव्हाण, सुरेश कोळवले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामचंद्र दिगंबर बाबर कुटुंब यांचा व मान्यवरांचा प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने रामचंद्र दिगंबर बाबर परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.


No comments:
Post a Comment