सांगोला तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार - सुनील उर्फ लकी कांबळे.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयासमोरील गेटच्या दक्षिण बाजूस मेन रस्त्यालगत जे हिरव्या कलरचे शेडनेट टाकलेले आहे.
ते त्वरित काढून कार्यालयासमोरील जागा खुली करण्यात यावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ लकी कांबळे यांनी सांगोला तहसीलदार यांना गुरुवार दिनांक 18/1/ 2024 रोजी देण्यात आले आहे.
कार्यालयात कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ असते. त्यांच्या दुचाकी व चार चाकी गाड्या कार्यालयासमोरच लावल्या जातात. तर ते अतिक्रमण काढून ती जागा रिकामी केली तर पार्किंगची गैरसोय होणार नाही. एखांदी ॲम्बुलन्स जरी रस्त्याने चालली तरी खूप अडचण येते व शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्याने जाताना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे त्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्यास सांगण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी 2024 रोजी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ लकी कांबळे यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment