पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
डॉ बाबासाहेब देशमुख यांना त्यांचे बंधू डॉ अनिकेत देशमुख यांनी केक भरवून शुभेच्छा दिल्या.
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथील शेकाप पक्ष कार्यालयासमोर बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 पासून रात्रीपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वह्या पेन व शालेय उपयोगी वस्तू घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष कार्यालयासमोर गर्दी केली होती.
डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या सर्वच दोन नंबर फळीतील नेत्यांनी हाजेरी लावली होती. विरोधी पक्षातील दोन नंबर फळीतील नेत्यांनी डॉ बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे सांगोला तालुक्यातील जनतेतून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
डॉ बाबासाहेब देशमुख याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या आजी माजी नगरसेवक, जि प सदस्य, पं स सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नेतेमंडळी, उद्योजक, युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून डॉ बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ बाबासाहेब देशमुख यांना त्यांचे बंधू डॉ अनिकेत देशमुख यांनी केक भरवून शुभेच्छा दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षामधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांच्या शुभेच्छा आदराने स्वीकारल्या दिवसभर वाढदिवसाच्या ठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
डॉ बाबासाहेब देशमुख यांनी वाढदिवसा दिवशी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करून समाजसेवेचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली.


No comments:
Post a Comment