भारताचे संविधान हे सर्व धर्मग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठ - श्री तानाजी सूर्यगंध.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
शिक्षण विभाग पुणे व इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कमलापूर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 23 डिसेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 28 डिसेंबर २०२३ रोजी प्रबोधन कार्यक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल सांगोला चे सहशिक्षक मा श्री तानाजी सूर्यगंध सर माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सोलापूर यांनी प्रमुख वक्ते म्हणून एनएसएस स्वयंसेवकांना भारतीय संविधाना विषयी माहिती देताना ते म्हणाले की आपला भारत देश धर्म व्यवस्थेच्या आधीन गेला आहे. आणि त्यामध्येच गुरफटून राहिल्यामुळे आपली प्रगती, विकास साधू शकत नाही. आपल्याला जे हक्क अधिकार मिळाले आहेत.
ते फक्त आणि फक्त संविधानामुळेच आपल्या देशाची व्यवस्था ही संविधानावर चालते त्यामुळे आपल्याला आवश्यकता आहे ती संपूर्ण संविधान जाणून घेण्याची या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळा कमलापूरचे मुख्याध्यापक मा श्री बशीर मुलाणी हे होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की संविधानाची माहिती आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाकडे संविधान प्रत असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. साईशा लवटे हिने केले या वेळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पाअधिकारी प्रा. संतोष राजगुरू कार्यक्रमाधिकारी प्रा . मिलिंद पवार कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ जुलेखा मुलाणी कार्यक्रमाधिकारी प्रा सौ सुनीता लिगाडे व एनएसएस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment