रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे येथे मंगळवार दिनांक 12-12-2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता शिक्षक पालक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. मागील सभेबाबत प्रथम सत्र निकाला बाबत, सहलीबाबत, विद्यार्थी केस रचनेबाबत, मुलींच्या केस रचनेबाबत, इयत्ता नववी दहावी परीक्षा बाबत, पाचवी व आठवी निकालाबाबत अभ्यासक्रमाबाबत आयत्या वेळेच्या विषयाबाबत या सर्व विषयावर पालक शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली.
व नवीन उपक्रम सुचविण्याच्या संकल्पना पालकांमधून व्यक्त करण्यात आल्या. त्या विषयी शिक्षकांनी अनुमती दर्शवली मा मुख्याध्यापकांनी शिक्षकांना संपर्क राहून प्रत्येक विषयाचे वर्गशिक्षक व विशेष शिक्षकांना सूचना केल्या.
या सभेचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री अवताडे सर तर प्रमुख पाहुणे पालक रामचंद्र बाबर व पालक सदस्य बाबासाहेब ढाळे व इतर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन मा श्रीनिवास येलपले सर यांनी केले.


No comments:
Post a Comment