Recent Tube

Breaking

Sunday, October 1, 2023

न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न



न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सांगोला रेल्वे स्टेशन व परिसर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली होती यावेळी सुरुवातीला सांगोला रेल्वे स्टेशनचे मॅनेजर मा. एस. एन. सिंग यांनी विद्यार्थ्यांना आपली स्वच्छता, आरोग्य, कर्तव्य, शिस्त,वर्तन कसे असावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.



तसेच रेल्वे संदर्भात इमर्जन्सी ,रजिस्ट्रेशन, रेल्वे भरती याविषयी माहिती दिली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे परिवेक्षक प्रा. संजय शिंगाडे एन.एस.एस. प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू, रेल्वे अधिकारी,कर्मचारी व बहुसंख्या एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते. यानंतर एन.एस.एस .स्वयंसेवकांकडून रेल्वे स्टेशन व परिसर स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हेमंत आदलिंगे व पर्यवेक्षक संजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू, कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद पवार व प्रा. सौ. जुलेखा मुलानी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment