Recent Tube

Breaking

Friday, October 20, 2023

तिसंगी तलाव ताबडतोब भरुन द्यावा- डॉ.भाई बाबासाहेब देशमुख.



तिसंगी तलाव ताबडतोब भरुन द्यावा- डॉ.भाई बाबासाहेब देशमुख. 


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


तिसंगी येथील उपोषणास डॉ.बाबासाहेब देशमुख यांची भेट. 


सांगोला:- सध्या पाऊस काळ कमी झाल्याने शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे.उभे पिके जळुन जाण्याच्या मार्गावर आहेतच..आशा‌ वेळी निदान जनावरांच्या व पिण्याच्या पाण्यासाठी तरी पाणी सोडण्यात यावे व‌ तिसंगी तलाव ताबडतोब भरुन घेण्यात यावा अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. तिसंगी तलाव भरुन घ्यावा या मागणीसाठी काही शेतकरी उपोषणास बसले आहेत.

 त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी नेते समाधान फाटे हे आमरण उपोषणाला बसले असुन त्या उपोषणाची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी योग्य तो मार्ग काढुन तिसंगी तलाव ताबडतोब भरुन देण्यात यावा. प्रत्येक वर्षी तिसंगी तलावता पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी जर शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत असेल तर ते अयोग्य असल्याचे डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन सांगितले. येणाऱ्या काळात या लाभधारक शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाण्याचे योग्य ते नियोजन करावे या बाबत सविस्तर चर्चा केली.

तसेच पंढरपूर तालुक्याचे युवा नेते समाधान काळे यांनी ही अधिकाऱ्यांना फोन करुन पाणी सोडण्यात यावी अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगीतले. सदर प्रसंगी भारत नाना‌ कोळेकर यांच्या सहित लाभक्षेत्रातील अनेक‌ शेतकरी उपस्थितीत असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

No comments:

Post a Comment