Recent Tube

Breaking

Monday, August 7, 2023

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मतदान जनजागृती अभियानांतर्गत पदयात्रा संपन्न.




न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मतदान जनजागृती अभियानांतर्गत पदयात्रा संपन्न. 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यालय, सांगोला (निवडणूक शाखा) यांचे संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोलाच्या प्रवेशद्वारा समोरून वासूद चौक,फुले चौक, नेहरू चौक,शिवाजी चौक, मनेरी गल्ली, कडलास नाका, वासुद चौक या मार्गावरून  काढण्यात आली.



    याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे,तहसीलदार मा. संजय खडतरे,संस्था सदस्य डॉ. अशोक शिंदे, दीपक खटकाळे, जयंत जानकर,पर्यवेक्षक संजय शिंगाडे,प्रकल्प अधिकारी संतोष राजगुरू सर,राष्ट्रीय सेवा योजनेमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment