चिकमहूद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते होणारा अनावरण.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील चिक महूद येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवार दिनांक 24/ 8/ 2023 रोजी दुपारी 1 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, सांगोला तालुक्याचे आमदार अॅड शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
व तसेच या कार्यक्रमास शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक पी सी झपके सर, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राज्य सचिव एन डी एम जी वैभव गीते, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरीकांनी बहूसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान चिकमहूद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment