मुंबई पोलिस दलात निवड झालेल्या श्रुतिका उबाळेचा समाजाच्या वतीने सत्कार संपन्न
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उबाळे यांची कन्या श्रुतिका उबाळे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 21 मे 2023 रोजी सायंकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमी कट्ट्यावर तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये श्रुतिका उबाळे व तिचे वडील ज्ञानेश्वर उबाळे यांचा सत्कार फेटा, शाल व पुष्पहार घालून माजी मुख्याध्यापक मधुकर गाडे, जि प प्राथमीक शाळा वाकी शिवणेचे मुख्याध्यापक सुरेश गोतसूर्य, माजी सरपंच श्रीकांत हंबीरराव या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.व तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी या सत्कारासाठी व शुभेच्छा देण्यासाठी नितीन होवाळ, दिपक होवाळ, बाळासाहेब राजगुरू, अनिल होवाळ, सर्जेराव उबाळे, बबन गोतसूर्य, अजित होवाळ, निलेश होवाळ, मायाप्पा उबाळे, सतीश उबाळे, बापूसाहेब मोरे, विशाल उबाळे, समाधान होवाळ, सुनील गोतसूर्य, समाधान होवाळ, समाधान होवाळ, आनंद वाघमारे, अतुल गवळी, महादेव होवाळ, उध्दव गोतसुर्य, नवनाथ कुंभार, महेंद्र होवाळ, शहाजी होवाळ, अशोक होवाळ, अमित कांबळे व बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.


No comments:
Post a Comment