श्रीकांत देशमुख यांच्या बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
भाजपाचे सोलापुर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्याबाबत एक मोठा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. देशमुख यांना अटकपूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.
मुंबई उच्च न्यायालय येथे बहुचर्चित श्रीकांत आप्पासाहेब देशमुख माजी जिल्हाध्यक्ष भाजप यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्यापुढे सुनावणी झाली असता. न्यायमूर्तींनी श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांचा सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.
उच्च न्यायालयात श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्या बाजूने वरिष्ठ विधीज्ञ श्री शिरीष गुप्ते, श्री आशिष गायकवाड, श्री उज्वल अंगदसुर्वे यांनी यशस्वीरित्या कायदेशीर बाजू मांडली. उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर करतेवेळी आदेशात तक्रार करता अर्जदार यांचे एकमेकांचे 2018 पासूनचे नातेसंबंध आणि जुनी मैत्री होती. त्याचबरोबर अर्जदार हे विवाहित होते याची पूर्ण जाणीव तथा याची पूर्ण कल्पना तक्रारदार महिलेस पहिल्यापासूनच होती.
तरी आपसातील प्रेम संबंध परस्पर सहमतीनेच ठेवले व तसे तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी ठेवले होते त्यामुळे अशा स्वरूपाच्या सदर घटना हा बलात्कार सारखा गुन्हा केला असे म्हणता येणार नाही. असे मत नोंदवून पुढील तपासा दरम्यान श्रीकांत देशमुख यांना पोलीस अधिकाऱ्यास वेळोवेळी उपस्थित राहून असेच सहकार्य करण्याचे आदेश पारित केले आहेत. याबाबतची माहिती अॅड आशिष गायकवाड (वकील उच्च न्यायालय) यांनी दिली आहे


No comments:
Post a Comment